गावठी कट्टयासह तरुणास अटक

On: March 10, 2025 8:41 PM

जळगाव : गावठी कट्टयासह फिरणाऱ्या तरुणास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. तुषार अशोक सोनवणे असे गावठी कट्टयासह अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस कर्मचारी नितीन ठाकूर यांना समजलेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. 

पोलीस निरीक्षक यांच्या गणेशोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोकॉ छगन तायडे, किरण पाटील, राहुल घेटे आदींच्या पथकाने वीस हजार रुपये किमतीच्या गावठी कट्टा सह तसेच पुण्यात वापरलेल्या मोटरसायकल सह तुषार सोनवणे यास अटक केली. पोलीस कर्मचारी नितीन ठाकूर यांच्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व पोलीस नाईक योगेश बारी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment