प्राण घातक हल्ल्यातील चौघांना सश्रम कारावास

घाटंजी (अयनुद्दीन सोलंकी) :– केगांव येथे अंगणात कुंपणाचे ताट्या बांधत असतांना एकाच कुटुंबात झालेल्या वादात आरोपी गजानन टोंगे, विनोद टोंगे, प्रमोद टोंगे व परशुराम टोंगे या ४ आरोपींना भादंवि कलम ३०७ अंतर्गत केळापूर येथील न्यायाधीश २ व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिजीत देशमुख यांनी ७ वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी ₹ २००० दंड ठोठावला आहे. 

शासनाकडून सहाय्यक सरकारी वकील ॲड. प्रकाश मानकर यांनी न्यायालयात युक्तीवाद केला. तर आरोपी गजानन टोंगे व इतर आरोपींची बाजू ॲड. गणेश धात्रक, ॲड. निलेश शक्ला यांनी मांडली. 

केगांव येथे कुंपणाचे ताट्या बांधत असतांना झालेल्या वादात गजानन लटारी टोंगे, विनोद गजानन टोंगे, प्रमोद गजानन टोंगे व परशुराम लटारी टोंगे यांनी  कु-हाड, काठ्या, सुरी या धारदार शस्त्राच्या केलेल्या हल्यात बालकृष्ण बबन टोंगे, बबन लटारी टोंगे हे गंभीर जखमी झाले होते. सदर प्रकरणाची तक्रार मारेगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्यावरुन मारेगांव पोलीस ठाण्यात ४ आरोपी विरुद्ध भादंवी कलम ३०७ सह कलम ३४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. सदर प्रकरणाचा मारेगांव पोलीसांनी तपास करून केळापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

सदर प्रकरणात भादंवि कलम ३०७ अंतर्गत आरोपी गजानन टोंगे, विनोद टोंगे, प्रमोद टोंगे व परशुराम टोंगे यांना प्रत्येकी ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व ₹ २००० दंड ठोठावण्यात आला. दंडा पैकी ₹ ६००० जखमी बाळकृष्ण टोंगे व बबन टोंगे यांना भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायाधीश २ व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिजीत देशमुख यांनी दिले आहे. सरकारी पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी अधिवक्ता ॲड. प्रकाश मानकर यांनी न्यायालयात मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here