घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील आदर्श गाव रामपूर येथे महसुल सप्ताह अंतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ संपन्न झाले. हे अभियान प्रत्येक मंडळाच्या मुख्यालयी आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात सहभागी लाभार्थी नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. या वेळी विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
शिरोलीचे मंडळ अधिकारी अनिल येरकर, सरपंच पेंदोर, डॉ. तलमले, मोतीराम कणाके, शिरोली मंडळ मधील तलाठी भारत लढे, प्रवीण ताकसांडे, मनोहर पन्हाळकर, अमित मिलमिले, कल्पना पुसनाके, आशिष कुरटकर, गणेश सलाम आणि कृषी सहायक जाधव आदी याप्रसंगी हजर होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठ शिरोली मंडळातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.








