जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस दल व मेरिको लिमिटेड, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस फायरिंग ग्राउंड, जळगाव येथे आयोजीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमात तब्बल १५०० रोपांची लागवड करण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते करण्यात आलेल्या या उपक्रमात हरीत जळगाव निर्मीतीचा संदेश देण्यात आला.
यावेळी पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक संदीप गवित, जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस उपअधीक्षक (गृह) संजय गायकवाड, मेरिको लिमिटेडचे वर्क हेड रविंद्र चोपडे, वनपरिक्षेत्र अधिकारी रामकृष्ण लामगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रेणी पोलीस उपनिरीक्षक व सहायक फौजदार अतुल वंजारी यांनी वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.







