पोलीस भरती पुढे ढकलण्याची खा. संभाजीराजे यांची मागणी

Maharshtra police
Maharashtra police imaginary pic

मुंबई : राज्यात १२ हजाराहून अधिक पदांसाठी पोलीस भरतीचा राज्य सरकारने बुधवारच्या बैठकीत निर्णय घेतला. एकीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असताना पोलिस भरती पुढे ढकलावी अशी मागणी खा. संभाजीराजे यांनी केली आहे.

खासदार संभाजीराजे म्हणाले की मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाज व्यथित आहे. त्यात राज्य सरकारचे टाइमिंग चुकले आहे. राज्यात पोलीस शिपायांची १२ हजार ५२८ पदे भरण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत मान्यता मिळाली आली. राज्यात सध्या पोलीस शिपायांची संख्या ९७ हजार आहे. शिपायांमधून पदोन्नती मिळालेले पोलीस नाईक ४२ हजार, हेड कॉन्स्टेबल ४३ हजार तसेच सहायक फौजदार २० हजार एवढी पोलिसांची संख्या आहे. नव्या भरतीमुळे सध्याच्या पोलिस दलावरील ताण हलका होणार आहे.

सन २०१९ आणि २०२० या वर्षांत साडेबारा हजार पदे भरण्याचे नियोजन गृह विभागाकडून करण्यात आले आहे. सन २०१९ मध्ये ५२९७ पदांच्या भरतीसाठी जाहिरात काढण्यात आली होती. मात्र, राज्य शासनाच्या ४ मे २०२० च्या आदेशानुसार सर्व प्रकारच्या सरकारी नोकर भरतीसाठी मनाई करण्यात आली होती. पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया जलद व पारदर्शकपणे केली जाणार आहे. या भरतीमुळे पोलीस दलावरील कामाचा ताण नक्कीच कमी होणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here