मुंबई : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती देण्यात आली आहे. राज्य सरकारने राज्यात मेगा पोलीस भरतीचा निर्णय घेतला आहे. या पोलीस भरतीत मराठा समाजाच्या तरुणांना आरक्षणाचा फायदा होणार नसल्यामुळे ही भरती पुढे ढकलण्याची भुमिका घेतली जात आहे. खासदार संभाजीराजेंनी राज्य सरकारवर टीका देखील केली आहे.
या सर्व पार्श्वभुमीवरील प्रतिक्रिया लक्षात राज्य सरकार या मेगा पोलीस भरतीत मराठा समाजासाठी १३ टक्के जागा राखीव ठेवण्याचा विचार करत आहे. त्यासाठी कायदेशीर बाब तपासून पाहिली जाईल असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.