नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 70 वा वाढदिवस गुरुवारी 17 सप्टेंबर रोजी उत्साहात झाला. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाकडूनही वाढदिवसाची जोरदार तयारी झाली होती. त्याचाच एक भाग म्हणून देशभरात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना देखील घडल्याचे समोर आले. वाढदिवस कार्यक्रमात हेलियम फुग्यांचा स्फोट झाला व त्या स्फोटात भाजपाचे 30 कार्यकर्ते जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे. तामिळनाडूच्या चेन्नई शहारात हेलियमच्या फुग्यांचा स्फोट झाल्याची भयंकर घटना घडली होती.
या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चेन्नई शहराच्या अंबात्तूर परिसरात होत असलेल्या या कार्यक्रमात जवळपास दोन हजार हेलियम गॅसचे फुगे आकाशात सोडण्याचे नियोजन होते. फुगे आकाशात सोडण्याची तयारी सुरु असतांना एकाएकी हा स्फोट झाला.