लखनऊ : महिलांवर होणारे अत्याचार व बलात्काराच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी उत्तर प्रदेशात योगी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. जो कुणी एखाद्या महिलेसोबत छेडखानी करेल अथवा तिच्यावर बलात्कार करेल त्या आरोपीला पोलिसांनी पकडल्यानंतर त्याचे पोस्टर शहरातील चौकात लावण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे.
देशात ज्यावेळी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरु होते. त्यावेळी उत्तर प्रदेशात देखील सीएए विरोधात आंदोलन सुरु होते. यावेळी उत्तर प्रदेशात देखील हिंसाचाराच्या घटना घडल्या. या घटनेच्या माध्यमातून सरकारी संपत्तीचे नुकसान झाले होते. त्यावेळी योगी सरकारकडून हिंसा करणाऱ्या व सरकारी संपत्तीची हाणी करणाऱ्या लोकांचे पोस्टर्स शहरातील रस्त्यांवर लावण्यात आले होते.
मिशन गैरवर्तन अंतर्गत महिला कर्मचाऱ्यांवर या कारवाईची जबाबदारी देण्यात आली आहे. महिला पोलीस कर्मचारी शहरातील चौकाचौकात नजर ठेवणार आहेत. राज्यात महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे वाढत असल्याच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री योगी सरकारने हा पोस्टर लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.