हातभट्टी दारु अड्ड्यावर छापा

On: September 28, 2020 2:07 PM

जळगाव : आज भल्या पहाटे जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली देऊळवाडे परिसरातील तिन गावठी हातभट्टी दारु अड्ड्यावर छापा घालण्यात आला. या कारवाईत देऊळवाडे येथील रहिवासी असलेल्या तिघा आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात येवून त्यांंच्या ताब्यातून 80,250 रुपयांचा एकुण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मुद्देमालात 35 ड्रम (60 लिटर) गावठी दारुचा समावेश आहे.

या कारवाईत पो.नि.रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अरुण सोनार, पोलिस नाईक चेतन पाटील, विलास शिंदे, संजय चौधरी व इतरांनी सहभाग घेतला. नवनियुक्त पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी गावठी हातभट्टीवर कारवाया करण्याच्या सुचना नुकत्याच झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत अधिकारी वर्गास सुचना दिल्या होत्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment