नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज एक महत्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे घरगुती हिंसा कायद्यानुसार सुनेला आपल्या सासू सास-यांच्या घरात राहण्याचा अधिकार आहे. जस्टिस अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या तिघा न्यायाधीशांच्या बेंचने तरुण बत्रा प्रकरणी दोघा न्यायाधीशांचा निर्णय बदलला आहे.
तरुण बत्रा प्रकरणातील दोघा न्यायाधीशांच्या बेंचने म्हटले होते की कायद्यानुसार महिला तिच्या सासू – सास-यांच्या मालकीच्या मालमत्तेत राहू शकत नाहीत. आता तीन सदस्यीय बेंचने तरुण बत्रा प्रकरणी निर्णय बदलत 6-7 प्रश्नांचे उत्तर दिले आहे. न्यायालयाने म्ह्टले आहे की, पतीच्या वेगवेगळ्या मालमत्तेतच नाही तर सामायिक घरात देखील हक्क आहे.