अर्णब गोस्वामीस अखेर अटक

On: November 4, 2020 9:59 AM

मुंबई : रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानातून अटक केली आहे. रायगड जिल्ह्याच्या अलिबाग येथील इंटेरियर डिझाईनर अन्वेय नाईक यांनी आत्महत्या केली होती.

या आत्महत्येस अर्णब गोस्वामी यांनी प्रवृत्त केले होते असा आरोप नाईक परिवाराने लावला होता. या प्रकरणी पोलिसात भा.द.वि. 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पथकाकडून आज सकाळी अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयात हजर केले जाणार आहे.

अटकेच्या वेळी अर्णब गोस्वामी यांनी पोलिसांवर विविध आरोप लावले. मला औषधी घेवू दिली नाही तसेच मारहाण झाली असे आरोप यावेळी अर्णब गोस्वामी यांचेकडून लावण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment