मुंबई-दिल्ली विमान आणि रेल्वेसेवा बंद होण्याची शक्यता !

On: November 20, 2020 5:48 PM

मुंबई : दिल्लीत वाढणारा कोरोनाचा कहर लक्षात घेता खबरदारी म्हणून मुंबई-दिल्ली दरम्यान हवाई आणि रेल्वे वाहतूक बंद ठेवण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरु आहे. येत्या काही दिवसात लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

राजधानी दिल्लीत सध्या कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत सतत वाढ होतांना दिसून आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काही निर्बंध लादले आहेत. त्यामुळे दिल्लीतील परिस्थिती पाहता मुंबईत देखील सतर्कता बाळगली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव संजीव कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली-मुंबई प्रवासामुळे कोरोनाचा प्रसार मुंबईत होवू शकतो. त्यामुळे या मार्गावरील हवाई आणि रेल्वे वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील या प्रस्तावास होकार दिला असल्याचे समजते. लवकरच संबंधीत विभाग प्रमुखांसोबत चर्चा केल्यानंतर तसा आदेश जारी केला जाऊ शकतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment