मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री आठ वाजता व्हिसीच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधतील. कोरोना रुग्णांची नव्याने वाढणारी संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनची घोषणा करणार की विज बिलाच्या सवलतीबाबत बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
कोरोनाचा वाढत जाणारा आकडा पाहता मुंबईतील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. नागपूर, पुण्यात कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता शाळा बंदच आहेत.