मुंबई : काही वेळापुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. या छोटेखानी लाईव्ह संवादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले की लॉकडाऊन हा काही माझ्या आवडीचा विषय नाही. मात्र कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्रिसुत्रीचा अवलंब करणे गरजेचे आहे. ती त्रिसुत्री म्हणजे हात धुणे, मास्क वापरणे व सोशल डिस्टन्स पाळणे.
पोस्ट कोवीड अर्थात कोरोना बरा झाल्यानंतरची लक्षणे आता दिसू शकतात. कोरोनापासून दोन नव्हे तर चार हात लांब रहा. पुन्हा लॉकडाऊन करायचा का? असा सवाल देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी बोलतांना केला. मी सर्व काही पुर्ववत सुरु करण्यास तयार आहे मात्र जे लोक हे सुरु करा ते सुरु करा असे म्हणतात ते जबाबदारी घेण्यास तयार आहेत काय? कोरोनाची दुसरी लाट येत आहे की सुनामी असे वाटत असल्याचे देखील मुख्यमंत्री बोलतांना म्हणाले. गर्दी वाढली म्हणजे कोरोनाची भिती अथवा संकट संपले असे समजू नका.
कार्तीकी यात्रेला तर अजिबात गर्दी करु नका असे आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी बोलतांना केले. दसरा मेळावा हा शिवसेनेचा एक पारंपारिक उत्सव आहे. मात्र यावेळी तो देखील अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी बोलतांना नमुद केले.