मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या पाठोपाठ आता बिड जिल्ह्यातील भाजपाचे माजी खासदार तथा माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी रा.कॉ. त प्रवेश केला आहे. जयसिंग गायकवाड यांच्या भाजप मधून रा.कॉ. तील प्रवेशामुळे भाजपला अजून एक धक्का बसला आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या जिल्ह्यात या प्रवेशामुळे खळबळ उडाली आहे.
गेल्या आठवड्यात जयसिंग गायकवाड यांनी बंडाचे निशाण फडकवले होते. त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला होता. भाजपमधून बाहेर आल्यावर जयसिंग गायकवाड यांनी पदवीधर निवडणुकीत रा.कॉ. उमेदवाराचा प्रचार देखील केला होता.
आज मुंबईत रा.कॉ.पक्ष कार्यालयात शरद पवारांच्या हजेरीत त्यांनी प्रवेश केला. जयसिंग गायकवाड हे तीन वेळा बीडमधून खासदार आणि पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. रा.कॉ. प्रवेशानंतर जयसिंग गायकवाड यांनी भाजपवर टीका केली आहे. चांगल्या कार्यकर्त्यांचा भाजपात वाळवंट केला जात असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.