पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे येथे कोरोना प्रतिबंधात्मक लस उत्पादित करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली.आज शनिवारी सायंकाळी 4:45 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले. ‘सिरम’कडे सध्या सर्व जगाचे लक्ष वेधले गेले आहे.
लस उत्पादनाची जगातील मोठी क्षमता सीरमकडे सध्या आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ऍस्ट्राझेनेका कंपनीकडून विकसित करण्यात आलेल्या कोरोनावरील लसीचे उत्पादन करण्याचे हक्क सीरम इन्स्टिट्यूटकडे आहेत. या लसीच्या चाचण्यांचे विविध टप्पे जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा आहे. कोरोना लस मोफत मिळणार आहे का? केव्हा उत्पादीत होईल व केव्हा मिळणार आहे याची उत्तरे पंतप्रधानांच्या दौ-यानंतर मिळण्याची शक्यता आहे.