कल्याण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उजवा हात समजले जाणारे नेते प्रताप सरनाईक यांची टिटवाळा गुरुवली येथील 100 कोटीची 78 एकर जमीन ईडीकडून जप्त करण्यात आल्याची माहिती बिजेपी नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. घोटाळा करण्यात आलेली शंभर कोटीची रक्कम परत केली नाही तर प्रताप सरनाईक यांच्या अन्य मालमत्ता देखील जप्त केल्या जाणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.
टिटवाळा गुरुवली येथील जमीनीच्या ठिकाणी भाजप नेते सोमय्या भेट देण्यास गेले होते. त्यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार, शक्तीवान भोईर तसेच विविध कार्यकर्ते उपस्थित होते. एनईसीएलच्या 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या रक्कमेतून सरनाईक यांनी टिटवाळा गुरुवली या ठिकाणी 78 एकर जमीन खरेदी केली होती. ही जमीन ईटीने जप्त करण्याची नोटिस सन 2014 साली काढण्यात आली होती. आता ही जागा जप्तीची कारवाई ईडीने केली आहे.