जळगाव : भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथराव खडसे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायत भाजपची सत्ता आली आहे.
कोथळी ग्रामपंचायतीच्या 11 जागांपैकी 2 जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरीत 9 पैकी 6 जागांवर भाजप पुरस्कृत पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. गेल्यावेळी कोथळी ग्रामपंचायतीत शिवसेनेचे सरपंच होते. मात्र, आता भाजपाचा सरपंच होणार आहे.
एकनाथराव खडसे यांनी रा.कॉ. त प्रवेश केल्यामुळे भाजपला मोठा हादरा बसला होता. एकनाथराव खडसे यांच्यासोबत भाजपच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रा.कॉ.त प्रवेश केला आहे. अजूनही बरेच प्रतिक्षा यादीवर आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली ही पहिली निवडणूक होती.