प्रत्येक शेतक-यास सन्मानाची वागणूक द्या – रोहित पवार

जळगाव : महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब अथवा तामिळनाडू राज्य असले तरी शेतकरी हा शेतकरी असतो. प्रत्येक शेतक-यास सन्मानाची वागणूक देण्याची मागणी कर्जत – जामखेड येथील रा.कॉ.चे आ. रोहित पवार यांनी केंद्र शासनास केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील कजगाव येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या उदघाटन सोहळ्याप्रसंगी रोहीत पवार आले होते. त्यावेळी त्यांच्या हस्ते या रुग्णालयाचे उदघाटन झाले. याप्रसंगी आ. रोहित पवार बोलत होते. शेतकरी आंदोलनाच्या वेळी त्यांच्या अंगावर पाण्याचे फवारे मारले गेले. बळाचा वापर करुन त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला गेला. या घटनेबाबत आ.रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली. 26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅलीस आपला रा.कॉ. चा पाठींबा असेल किंवा नसेल याबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी माहित नसल्याचे म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here