पगारच मिळाला नाही – चालकाने पाच बसेस जाळल्या

On: January 25, 2021 4:09 PM

मुंबई : काही दिवसांपुर्वी बोरिवली परिसरात पाच लक्झरी बसेस जळाल्या होत्या. त्या बसेसला शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचे म्हटले जात होते. तसा अंदाज देखील व्यक्त करण्यात येत होता. मात्र या घटनेमागचे वेगळेच कारण आता पुढे आले आहे.

पगार मिळाला नाही म्हणून एका चालकाने सलग पाच बसेस जाळून आपला राग व्यक्त केल्याची बाब पुढे आली आहे. जळालेल्या या पाच बसेसचे मुल्य 3 कोटी 30 लाख रुपये एवढे आहे. जळालेल्या या पाच बसेसचा विमा काढण्यात आला नव्हता. बस चालक अजय रामपाल सारस्वत यास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याने बसेस पेटवून दिल्याचे म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment