नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापुर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तेथील कॅंटीनच्या जेवणावरील अनुदान बंद केल्याचे म्हटले आहे. संसदेच्या कॅंटीनमधे शाकाहारी थाळी शंभर रुपयात तर मांसाहारी बुफे सातशे रुपयांना मिळणार आहे. सर्वात स्वस्त चपातीची किंमत प्रती नग तिन रुपये राहणार आहे. चिकन बिर्यानी 100 रुपये, चिकन करी 75 रुपये, साधा डोसा 30 रुपये व मटण बिर्याणीसाठी दिडशे रुपये खर्च येणार आहे.