मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री असलेले धनंजय मुंडे त्यांच्या विवाहबाह्य संबंधामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहेत. मुंडे व ती महिला हे दोघे जण आपसातील वाद मध्यस्थांमार्फत समजून उमजून गोडी गुलाबीने सोडवून घेण्यास तयार असल्याबाबतचे हमीपत्र मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आले आहे. न्या. ए.के.मेनन यांच्यासमक्ष या विषयी सुनावणी पार पडली.
संबंधीत महिलेने धनंजय मुंडेंसोबत असलेले फोटो व्हायरल केले होते. त्यामुळे धननंजय मुंडे यांनी त्या महिलेविरुद्ध डिसेंबर 2020 मधे मानहाणी दावा दाखल केला होता. अंतरीम दिलासा मिळाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी नुकसानभरपाईची केलेली मागणी मागे घेतली. यापुढे अशा स्वरुपाच्या पोस्ट रोखण्याचे निर्देश त्या महिलेस देण्याची मागणी त्यांनी न्यायालयास केली होती. उच्च न्यायालयाने ती मागणी मान्य केली व त्या महिलेस खासगी पोस्ट व्हायरल करण्यास मनाई केली.
आता हा आपसातील वाद मध्यस्तामार्फत सामोपचाराने मिटवून घेण्याची तयारी असल्याचे हमीपत्र उच्च न्यायालयात सादर करण्यात आले आहे. मध्यस्तीचा सर्व खर्च स्वत: धनंजय मुंडे उचलणार आहेत.