राळेगणसिद्धी : शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासह कृषी कायद्यासंदर्भात विविध मागण्यांसाठी अण्णा हजारे यांनी उद्यापासून उपोषण करण्याचे निश्चीत केले होते. भाजप नेते वारंवार त्यांची मनधरणी करण्यासाठी जावून देखील अण्णा हजारे आपल्या उपोषण्याच्या निर्णयावर ठाम होते. मात्र आता जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपले उपोषणाचे अस्त्र मागे घेतले आहे.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय कृषीराज्यमंत्री दोघांनी अण्णांचे मन वळवण्याचे प्रयत्न केले. केंद्र शासनाने शेतकरी हिताच्या निर्णयांना उशीर झाला असल्याचे कबुल केले. केंद्राने उच्चाधिकार समिती निर्माण करत लवकरात लवकर ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे उपोषण मागे घेत असल्याचे अण्णा हजारे यांनी जाहीर केले. उद्या 30 जानेवारी पासून अण्णा हजारे उपोषण सुरु करणार होते.