मुंबई : सेवानिवृत्तीच्या जवळ येवून पोहोचलेल्या सरकारी कर्मचा-यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. 28 फेब्रुवारीच्या आत पदोन्नती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक सरकारी कर्मचारी वर्गाचा प्रमोशनचा खडतर रस्ता गुळगुळीत झाला आहे.
दिव्यांगांना सेवेत प्रमोशन आवश्यक असले तरी ते दिले जात नसल्यामुळे भोलासो चौगुले, भीमाशंकर मटकरे व काही कर्मचाऱ्यांनी मिळून अॅड. विनोद सांगवीकर, अॅड. सुगंध देशमुख यांच्या मदतीने उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर न्या अमजद सय्यद व न्या. माधव माददार यांच्या खंडपीठासमोर सुनावली झाली.
याप्रकरणी आदेश दिल्यानंतर देखील सरकारी सेवेत त्यांना प्रमोशन नाकारले जात आहे. हे कर्मचारी येत्या 28 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत. गेल्या काही महिन्यापुर्वी उच्च न्यायालयानेच सरसकट सर्व प्रमोशनला स्थगिती दिली होती. या प्रकरणी पुढील सुनावणीची तारीख 25 फेब्रुवारी ठेवण्यात आली आहे.