नवी दिल्ली : फॅमिली पेन्शनसंदर्भात पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाकडून एक निर्णय देण्यात आला आहे. या निर्णयानुसार पत्नीने तिच्या पतीचा खून केला असला तरीदेखील ती पत्नी फॅमीली पेन्शन घेण्यास पात्र राहील.
बलजीत कौर प्रकरणी न्यायालयाने 25 जानेवारी रोजी दिलेल्या निर्णयानुसार सांगितले आहे की सोन्याची अंडी देणा-या कोंबडीला कुणी कापत नसतो. कुणाचा खून झाला तरी त्याच्या पत्नीला त्याच्या फॅमीली पेन्शनमधून कमी केले जावू शकत नाही. फॅमीली पेन्शन योजना ही एक कल्याणकारी योजना आहे. सरकारी कर्मचा-याच्या मृत्यूनंतर त्याच्या परिवाराला या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात येते. पत्नी जरी गुन्हेगारी वृत्तीची असली तरी देखील तिला तिच्या पतीच्या पेन्शनवर हक्क राहणार आहे.
बलजीत कौर यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा निकाल दिला आहे. अंबाला येथे राहणा-या थील बलजीत कौर यांनी न्यायालयात कथन केले की त्यांचा पती हरीयाणा राज्यत सरकारी कर्मचारी होता. तरसेम सिंग या तिच्या पतीचे सन 2008 मधे निधनझाले. त्याचे नाव सन 2009 मधे त्याचे नाव या प्रकरणी पुढे आल्यानंतर सन 2011 मधे बलजीत कौर यांना दोषी ठरवले गेले. बलजीत कौर यांना सन 2011 पर्यंत पेन्शन नियमीतपणे सुरु होती. गुन्हेगार सिद्ध झाल्यानंतर बलजीत कौर यांना हरीयाना शासनाने त्यांच्या पेन्शनवर बंदी आणली.
आता त्यांची पेन्शन नव्याने सुरु करण्याचा निर्णय देण्यात आला आहे. त्यांची पेन्शन दोन महिन्याच्या आत जमा करावे असे आदेश न्यायालयाने दिले आहे. पतीच्या हत्येनंतर पत्नीचा त्याच्या पेन्शनवर हक्क असून तिने दुसरा विवाह केला तरीदेखील ती पेन्शन घेण्यास पात्र राहील.