नागपूर: अडीच कोटी रुपयाच्या अपसंपदा प्रकरणात डॉ. प्रवीण मधुकर गंटावार व डॉ. शिलू प्रवीण गंटावार यांना प्रत्येकी एक लाख रुपयाचे वैयक्तिक बंधपत्र व तेवढ्याच रकमेचे सक्षम जामीनदार सादर करण्याच्या अटीवर तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
२३ जुलै २०१४ रोजी मडावी नामक व्यक्तीने गंटावार दाम्पत्याकडील अपसंपदेची लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर सन २०१५ मध्ये गंटावार दाम्पत्याकडील संपत्तीची चौकशी सुरू झाली. चौकशीच्या आधारे १ जुलै रोजी सीताबर्डी पोलिसांनी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (ए)(बी) अंतर्गत गंटावार दाम्पत्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.
गंटावार दाम्पत्याने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. डॉ. प्रवीण खासगी रुग्णालय चालवत असून डॉ. शिलू या मनपा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहेत.