जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं ट्विटर अकाउंट हॅक ?

मुंबई : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाविकास आघाडी सरकारचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे ट्विटवर अकाउंट कुणीतरी हॅक केल्याचे समजते. त्यांच्या ट्विटवर अकाउंटवरील प्रोफाइल फोटोच्या एवजी कुणातरी दुस-याचा फोटो दिसत असल्यामुळे त्यांचे ट्विटवर अकाउंट हॅक झाल्याचे म्हटले जात आहे.

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे नेहमीच त्यांच्या ट्विटर वरुन जनतेच्या संपर्कात असतात. त्यांचे ट्विटर खाते कुणीतरी हॅक केल्याचे म्हटले जात आहे. तसेच गुलाबराव पाटील यांचे खाते लॉक झाल्याचे देखील दिसत असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत नेमके अधिकृत वृत्त समोर आले नसले तरी त्यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here