जयपूर : महामार्ग तयार करणा-या कंपनीकडून दहा लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी जयपुर येथील उपविभागीय न्यायाधिश पिंकी मीना यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या लाचखोरीच्या प्रकरणाने आता वेगळाच टर्न घेतला आहे.
न्यायधिश मीना यांच्या लाच प्रकरणी खटल्याचे कामकाज राजस्थान उच्च न्यायालयाच्या जयपूर खंडपीठात इंद्रजीत सिंग यांच्या न्यायालयात सुरु आहे. या कामकाजादरम्यान लाचखोर महिला अधिकारी पिंकी मीना यांच्यावर न्या. इंद्रजीत सिंग यांचे प्रेम जडले. या प्रेमाला लाचखोर महिला अधिकारी पिंकी मीना यांनी देखील सहमती दिली. आपल्यासोबत लग्न करण्याच्या अटीवर न्यायधिशांनी आरोपीच्या पिंज-यातील महिला अधिका-यास दहा दिवसांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. लग्नाच्या पाच दिवसांनी 21 फेब्रुवारी रोजी पिंकी मीना यांना पुन्हा सरेंडर व्हावे लागणार आहे. या खटल्याची पुढील सुनावणी 22 फेब्रुवारी होणार आहे. खालच्या न्यायालयात पिंकी मीना यांचा जामीन अर्ज नामंजुर झाला होता.