मथुरा : एखाद्या महिलेला मरेपर्यंत फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी भारतात प्रथमच होणार आहे. नात्यातील सात जणांचा कु-हाडीने खून केल्या प्रकरणी उत्तर प्रदेशातील शबनम नामक महिलेस ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. सन 2008 मधे ही खुनाची घटना घडली होती.
या घटनेतील आरोपी महिलेचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला आहे. मथुरा जेलमध्ये या शिक्षेची अंमलबजावणी करण्याकामी तयारी सुरु झाली असून निर्भया प्रकरणातील जल्लादची या कामी नियुक्ती झाली आहे. फाशीची तारीख मात्र ठरलेली नाही.
मथुरेतील जेलमधे सुमारे दिडशे वर्षापुर्वी महिलांसाठी फाशीघर तयार करण्यात आले आहे. मात्र आजपर्यंत कुणाही महिलेला फाशीची शिक्षा येथे देण्यात आलेली नाही. महिलेस फाशी देण्यासाठी बिहारमधील बक्सर येथून दोर मागवला आहे.