महिला न्यायधीशाचा फेटाळला अटकपूर्व जामीन

On: February 24, 2021 8:29 PM

पुणे : सुरु असलेल्या खटल्याचे कामकाज रद्द करण्यासह न्यायधिशांना मॅनेज करुन निकाल बाजूने लावून देण्याकामी महिला न्यायधिशाने खासगी महिलेला अडीच लाख रुपयांची लाच मागीतली होती. त्या अडीच लाखापैकी पन्नास हजार रुपयांची लाच सदर महिला न्यायधिशाने स्विकारली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदर महिला न्यायधिशास अटक केली होती. या कारवाईत महिला न्यायधिशांचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले होते.

खासगी महिला व महिला न्यायधिश याच्यात वेळोवेळी 147 फोन कॉल झाले असल्याचे तपासात समोर आले आहे. आणखी जवळपास आठ जणांसोबत त्या खासगी महिलेने संपर्क साधला आहे. त्यांची प्रकरणे देखील या महिला न्यायधिशांच्या न्यायालयात पडून आहेत. जिल्हा सरकारी वकील प्रेमकुमार आगरवाल यांनी या प्रकरणी युक्तीवाद केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment