नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर गेल्या वर्षभरापासून सर्वोच्च न्यायालयात दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सुनावणी सुरु आहे. मात्र आता 15 मार्च पासून सर्वोच्च न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणी होणार असली तरी त्यासाठी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे लागणार आहे. प्रत्यक्ष सुनावणी होण्यासाठी वकील संघटनांनी मागणी केली होती.
प्रायोगीक तत्वावर मंगळवार, बुधवार आणी गुरुवारी अंतिम सुनावणी अथवा नेहमीची सुनावणी मोजक्या स्वरुपात होणार आहे. पक्षकारांची संख्या किती आहे ते बघून निर्णय घेतला जाईल. मोजक्या कोर्ट रुममधे सुनावणी घेतली जाईल. सोमवार आणि शुक्रवार या दिवशी व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून सुनावणी घेतली जाणार आहे.
प्रत्येक कोर्ट रुममधे वकील, पक्षकार यांची संख्या विस राहील. त्यापेक्षा अधिक संख्या असल्यास व्हीसी अथवा टेली कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून सुनावणी होईल. प्रत्यक्ष सुनावणीच्या वेळी पक्षकारांचा प्रत्यक्ष सहभाग ठेवायचा अथवा नाही याचा निर्णय खंडपीठ घेणार आहे.