पोलिसकर्मी तुषार पाटील यास कारणे दाखवा नोटीस

On: June 16, 2026 11:43 AM

जळगाव – जळगाव शहराच्या खोटे नगर परिसरातील ७ लाख ६० हजार रुपयांच्या रोख रकमेच्या लूटप्रकरणात जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला नेमणूकीस असलेला पोलिस शिपाई तुषार पाटील यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या लुट प्रकरणातील गुन्हेगारांसोबत तुषार पाटील याने संपर्क साधल्याचा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. पोलिस शिपाई तुषार पाटील याने संबंधित गुन्हेगारांसोबत जवळपास १५ मिनिट संवाद साधल्याचे पोलिस अहवालात नमूद करण्यात आले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांनी तुषार पाटील यांची चौकशी केली.

चौकशीअंती त्यास त्याची पगारवाढ का रोखण्यात येवू नये यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून गुन्हेगारांसोबत त्याने केलेल्या संपर्काचे कारण स्पष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या लूटप्रकरणातील चौघा आरोपींची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. आरोपींमध्ये रेशीर सुशीर चौधरी, गजेंद्रसिंग जाधव, रमेश भगवान पाटील आणि अमोल दत्तात्रय जाधव यांचा समावेश आहे.

या संशयीत आरोपींनी सुमारे ७ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कम लुटल्याचा आरोप असून, पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सुमारे ४ लाख ८० हजार रुपये रोख जप्त केले आहेत. उर्वरित रकमेचा शोध सुरू असून, पुढील तपास पीएसआय श्यामकुमार मोरे करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment