चंदीगड : आंतरधर्मीय विवाहाबाबत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाकडून एक महत्वाचा निर्णय देण्यात आला आहे. हिंदु मुलासोबत मुस्लिम मुलींचा विवाह कायदेशीर मानला जाऊ शकत नसल्याचा निर्णय पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र दोघे जण सज्ञान असतील तर ते एकमेकांच्या सहमतीने संबंधात सोबत राहू शकतात असे देखील न्यायालयाने म्हटले आहे.
पंचवीस वर्षाच्या हिंदु मुलगा व अठरा वर्षाची मुस्लीम मुलगी यांच्या दाखल याचीकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निर्णय दिला. या घटनेतील हिंदु मुलगाव मुस्लीम मुलगी या जोडीने 15 जानेवारी रोजी शिव मंदीरात हिंदु पद्धतीने विवाह केला होता. आमल्या जिविताला दोघांच्या परिवारापासून धोका असल्याचे म्हणत त्यांच्याकडून अंबाला पोलिस अधिक्षकांकडे सुरक्षेची विनंती करण्यात आली होती. त्यांना सुरक्षा मिळाली नाही म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागीतली होती.
मुस्लीम मुलगी आणि हिंदु मुलगा यांचा विवाह कायद्याने वैध नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले. मुलीने धर्मांतर करुन हिंदू धर्म स्विकारला तर हा विवाह वैध राहील असे न्यायालयाने म्हटले. या प्रकरणी या तरुणीने धर्मांतर केले नाही. त्यामुळे हा विवह अवैध असल्याचे मत उच्च न्यायालयाने दिले. असे असले तरी याचिका करणारे सज्ञान असल्यामुळे ते एकमेकांसोबत राहू शकतात व संबंध ठेवू शकतात असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. या जोडगोळीला सुरक्षा देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले.