धुळे : कोरोनाची लक्षणे दिसताच धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील शिक्षकाने तापी नदीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. राजेंद्र भानुदास पाटील असे नदीत उडी घेणा-या शिक्षकाचे नाव आहे.
राजेंद्र पाटील या शिक्षकास कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. आपणास कोरोना झाल्याच्या भितीपोटी राजेंद्र पाटील यांनी थेट नदीत उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. घटनास्थळावर शिक्षक राजेंद्र पाटील यांची मोटारसायकल व डॉक्टरांची फाईल आढळून आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे.






