भाजप नगरसेविकेच्या मुलाचा गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

On: March 29, 2021 9:13 AM

पिंपरी : चिंचवड येथील भाजप नगरसेविकेच्या मुलाने त्याच्या वडिलांच्या पिस्तुलातून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली. प्रसन्ना शेखर चिंचवडे (21) रा. चिंचवडे नगर चिंचवड असे आत्महत्येचा प्रयत्न करणा-या तरुणाचे नाव आहे. तो चिंचवड येथील भाजप नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे यांचा मुलगा आहे.

रविवारी रात्री जेवण केल्यानंतर खोलीत गेल्यानंतर प्रसन्ना याने हा प्रकार केला. काही वेळातच गोळी झाडल्याचा आवाज आल्यामुळे घरातील सदस्यांनी त्याच्या खोलीकडे धाव घेतली असता तो जखमी झाल्याचे दिसून आले. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment