आ.किशोर अप्पा यांनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा

On: March 30, 2021 9:53 PM

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा – भडगाव मतदार संघात वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या  लक्षात घेता आमदार किशोर आप्पा पाटील सक्रिय झाले आहेत. पाचोरा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्यासह त्यांनी पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेत कोरोना स्थितीचा आढावा घेतला. पाचोरा व भडगाव शासकीय रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय साधन सुविधांसाठी किती निधी लागतो याबाबत त्यांनी माहिती घेतली. वैद्यकीय साहित्य खरेदी करून गोर गरीब रुग्णांना चांगला उपचार मिळवून देण्यासाठी  आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले आहे. वैद्यकीय सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. यासोबत अधिकारी, कर्मचारी व डॉक्टर्स बांधवानी देखील पहिल्या टप्यात केलेल्या कामाप्रमाणेच आता दुसऱ्या टप्यात स्वतःला झोकून देत  काम करण्याचे आवाहन केले. मात्र जनतेने देखील आपली जबाबदारी ओळखून शासन नियमांचे पालन करावे अन्यथा लॉक डाऊन शिवाय पर्याय नसल्याचा इशारा त्यांनी दिला. त्यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात जाऊन रुग्णांशी संवाद साधत तब्बेतीची विचारपूस केली. याठिकाणी उपलब्ध असलेल्या सोळा बेडस व्यतिरिक्त पुन्हा नवीन सुमारे १८ ऑक्सिजन पुरवता येईल असे  बेड निर्माण करण्याचे निश्चित करत त्याचे त्वरित काम सुरू करण्याच्या सूचना अधिकारी वर्गाला दिल्या.

आमदार किशोर आप्पा पाटील यांनी घेतलेल्या बैठकीच्या वेळी  उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, पाचोरा तहसीलदार कैलास चावडे, मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर, पोलीस उप निरीक्षक गणेश चौभे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमित साळुंखे, भडगावचे डॉ.प्रशांत पाटील,  डॉ.भूषण मगर, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी, संभाजी पाटील, सोनार, अभिजीत येवले,भडगाव पालिकेचे परमेश्वर तावडे, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, पत्रकार प्रवीण ब्राह्मणे आदींची उपस्थिती होती. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी पाचोरा उपविभागात असलेल्या प्रशासकीय कामांची माहिती दिली. डॉ समाधान वाघ, डॉ अमित साळुंखे यांनी पाचोरा व डॉ. प्रशांत पाटील यांनी भडगाव तालुक्यातील वैद्यकीय उपचारांची माहिती दिली.सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेले लसीकरण, तपासणी कीट, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर  आदी बाबत  त्यांनी याप्रसंगी माहिती घेतली. पाचोरा व भडगाव नगरपालिका हद्दीत घरोघरी जाऊन तपासणी करण्यासाठी पथकाची निर्मिती करण्याच्या त्यांनी सुचना दिल्या.

पाचोरा उपविभागातील काही हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांकडून विविध प्रकारचे सिटी स्कॅन,रक्त चाचण्यांचे रिपोर्ट्स ,रुग्णवाहिका, रेमेडिसिव्हर सह काही इंजेक्शनची शासनाने निर्धारित रकमेपेक्षा चढ्या भावाने विक्री वा तपासण्या होत असल्याच्या काही तक्रारी प्राप्त होत असून याबाबत कोणाची काही तक्रार असल्यास नागरिकांनी प्रांताधिकारी, तहसीलदार यांचे कडे तक्रार करण्याचे आवाहन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले आहे.याबाबतचे शासनाने निर्धारित केलेले दर पुन्हा एकदा  जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment