घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

On: March 31, 2021 8:07 PM

जळगाव : सोने, चांदी व रोख रक्कम अशी एकुण 65 हजार रुपयांचा मुद्देमालाची चोरी करणा-या सराईत आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी आज जळगाव उप कारागृहातून ताब्यात घेत अटक केली आहे. रईस खान हमीद खान उर्फ लाला (रा. गणेशपुरी मास्टर कॉलनी जळगाव) असे त्याचे नाव आहे. जळगाव शहर पोलिस स्टेशनसह इतर विविध गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. सध्या तो जळगाव उप कारागृहात होता.

65 हजाराच्या मुद्देमालाच्या चोरीप्रकरणी तो एमआयडीसी पोलिसांना हवा होता. कायदेशीर पुर्ततेनंतर जळगाव उप कारागृहातून ताब्यात घेत रईस खान यास न्या. सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 3 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे अ‍ॅड. प्रिया मेढे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार अतुल वंजारी व सदानंद नाईक करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment