पित्याने मुलावर केला प्राणघातक हल्ला..!!

On: July 6, 2020 11:40 AM

बीड :  मुलाने पित्याला केलेली मारहाण पित्याच्या जिव्हारी लागली. त्यातून कु-हाडीच्या घावात पित्याने मुलाला जखमी केल्याची घटना आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे घडली. मुलाने विनाकारण दोन तीन वेळा मारहाण केल्याचा राग दारुच्या नशेत पित्याने मनात धरला. पहाटे गाढ झोपेत असलेल्या मुलावर कु-हाडीचे वार झाल्यामुळे त्याला उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे.

आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील बाबासाहेब किसन खंडागळे हा मजुर राहतो. त्याला राहुल खंडागळे हा तिस वर्ष वयाचा मुलगा आहे. राहुलने विनाकारण आपला पिता बाबासाहेब यास मारहाण केली होती. त्यामुळे आज भल्या पहाटे त्याने मुलगा राहुल याच्यावर कु-हाडीचे घाव घातले. यात तो जबर जखमी झाला. जखमीला अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे देखील बघा ..!!!दारुची चोरटी वाहतूक ; दोघांवर कारवाई

आष्टी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सलिम पठाण,  पोलीस नाईक संतोष नाईकवाडे, पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब  भगत, बंडू दुधाळ, वाहन चालक बांगर यांनी हल्लेखोर बाबासाहेब किसन खंडागळे याला ताब्यात घेतले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment