मुंबई : शंभर कोटी रुपयांच्या कथित आरोपामुळे अडचणीत आलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे महाविकास आघाडी सरकारमधे हालचाली गतीमान झाल्या आहेत.
बड्या नेत्यांच्या बैठकांचे सत्र आता सुरु झाले असुन पुढील गृहमंत्री पद कुणाकडे जाते याकडे संबंधीतांचे लक्ष लागले आहे. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये निलंबीत स.पो.नि.सचिन वाझे यांच्यामार्फत केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात याचीका दाखल केली. मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, अनिल देशमुख हे गृहमंत्री पदावर असल्यामुळे याप्रकरणी योग्य त्या प्रमाणात निष्पक्ष चौकशी पोलिसांना करता येणार नाही. त्यामुळे याप्रकरणी चौकशीची सुत्रे सीबीआयकडे द्यावी.