गृहमंत्रीपदी दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा

मुंबई : अनिल देशमुख यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढील राजकीय हालचालींनावेग आला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका व चर्चा सुरु झाल्या असून शरद पवार यांचे जवळचे आणि विश्वासू समजले जाणारे दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची गृहमंत्रीपदासाठी जोरदार चर्चा सुरु आहे. दिलीप वळसे पाटील यांचे गृहमंत्रीपदासाठी नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.

असे असले तरी हसन मुश्रीफ यांचे नाव देखील गृहमंत्रीपदाच्या शर्यतीत काही जण खासगीत बोलत आहेत. हसन मुश्रीफ मुंबईच्या दिशेने रवाना झाले असल्याचे समजते. मात्र दिलीप वळसे पाटील हेच गृहमंत्रीपदाचा पदभार घेतील असे म्हटले जात आहे. सध्या दिलीप वळसे पाटील यांच्याकडे असलेला उत्पादन शुल्क विभागाचा कारभार अजित पवार यांच्याकडे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here