पुणे : कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढतच आहे. कोरोना रुग्णांची संख्येचा वाढता क्रम लक्षात घेता वैद्यकीय मनुष्यबळ अपुर्ण पडत असल्याचे दिसून येत आहे. आज सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांची महत्वाची बैठक आहे. या पार्श्वभुमीवर कडक लॉकडाऊन होण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मिळत आहे.
पुणे येथे आज सर्वपक्षीय बैठक आहे. या बैठकीत संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच सामायीक निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळा निर्णय घेऊन चालणार नसल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. या घडीला विकेंड लॉकडाऊन उपयोगाचा नसून तिन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन करावा लागणार असल्याचे सुतोवाच मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले होते. महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.