सातारा : काही दिवसांपुर्वी पुकारण्यात आलेला विकेंड लॉकडाऊनच्या विरोधात भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी सातारा जिल्हा प्रशासनाच्या विरोधात राजेंनी पवित्रा घेतला होता. सातारा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर झाडाखाली बसून भिकमांगो आंदोलन राजेंनी केले होते. या भिकमांगो आंदोलनातून जमा झालेले 450 रुपये त्यांनी जिल्हाधिका-यांकडे जमा केले होते. लॉकडाऊन मागे घेतला नाही तर असंतोषाचा भडका उडणार असल्याचा इशारा उदयनराजेंकडून देण्यात आला होता. उदयनराजेंनी दिलेले साडेचारशे रुपये खुप कमी असल्याचे कारण जिल्हाधिका-यांनी दाखवत घेण्यास नकार दिला. ती रक्कम जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मनी ऑर्डरच्या माध्यमातून उदयनराजेंच्या पत्यावर रवाना केली आहे.