मुंबई : राज्यातील किराणा दुकाने आता निर्बंध कालावधीत सकाळी 7 ते 11 या वेळतच सुरु राहणार असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री यांनी म्हटले आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता लॉकडाऊन अजून कडक करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्याचे निर्देश देखील उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत दिले आहेत. निर्बंध कालावधीत किराणा खरेदीच्या नावाखाली नागरिक दिवसभर फिरत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे किराणा दुकानाची वेळ सकाळी सात ते अकरा अशी करण्यात आल्याचे बैठकीत सांगण्यात आले आहे.