गोंदेगाव ता.सोयगाव (वार्ताहर) : गोंदेगाव ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक सुनील राकडे यांच्या कथीत आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी केंदे यांनी गोंदेगाव ग्रामपंचायतीस भेट देऊन जवळपास चार तास कसून चौकशी केली. संबंधित तक्रारदार भाजपा तालुका सरचिटणीस समाधान सूर्यवंशी यांनी त्यांचे म्हणणे लेखी स्वरुपात देऊन सर्व पुराव्यानिशी कागदपत्रे यावेळी सादर केली. यावेळी संबंधीतांवर कारवाईच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी सरपंच सौ. वनमाला शरद निकम, सदस्य अतुल बोरसे, गौरव बिनद्वाल, शरद निकम, मनसेचे संकेत पवार आदी उपस्थित होते.