Other
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे ‘भारतीय स्वातंत्र्याची गाथा’ खास प्रदर्शन
जळगाव : भारतावर ब्रिटिशांनी केलेल्या अन्याय अत्याचाराविरुध्द स्वातंत्र्य सैनिकांनी चळवळ, आंदोलनांच्या माध्यमातून प्रतिकार केला. वेगवेगळ्या ठिकाणांची स्वातंत्र्य सैनिकांची भुमिका ऐतिहासिक ठरली. त्याग, बलिदानातून भारताची शौर्य....
कविवर्य ना.धों. महानोर यांना आचार्य अत्रे मानचिन्ह पुरस्कार प्रदान
जळगाव : आचार्य अत्रे हे साहित्य, नाट्य, चित्रपट, उद्योग, वक्तृत्व असा सर्वच क्षेत्रांतील सार्वभौम उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या नावाने मिळालेले मानचिन्ह मी कृतज्ञतेने स्विकारतो असे....
जैन इरिगेशन व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन तर्फे जळगाव शहरात रोषणाई
जळगाव दि.13 प्रतिनिधी– स्वातंत्र्याचा इतिहास हा बलिदान आणि शौर्याचा आहे. स्वातंत्र्यविरांच्या पराक्रमाच्या या गाथेचे स्मरण करीत समतेसोबतच विश्वशांतीचा संदेश देणारी विशेष सजावट चौकांमध्ये करण्यात आली आहे. तिरंग्यातील शौर्य, शांती, त्यागाच्या तिनही रंगाच्या विद्युत रोषणाईने जळगाव शहर उजाळुन निघाले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने जैन उद्योग समूहाच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन तर्फे आकर्षक रंगसंगती असणारी विद्युत रोषणाई केली आहे. यात शहरातील राष्ट्रीय महापुरूषांच्या १९ पुतळ्यांसह, लालबहादूर शास्त्री टॉवर, स्वातंत्र्य चौक, काव्यरत्नावली चौक यासह महात्मा गांधी उद्यान, भाऊंचे उद्यान यांचा समावेश आहे. यातुन शहरवासियांच्या मनात राष्ट्राभिमानाचा जागर होत आहे. जैन उद्योग समूहाच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व भवरलालॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन तर्फे शहरातील चौकांवर विशेष सजावटींसह प्रबोधनात्मक संदेश दिले आहे. यातून राष्ट्रीय एकात्मेची जाणिव निर्माण होत आहे. काव्यरत्नावली चौकात विशेष सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सोबतच लालबहादूर शास्त्री टॉवर, स्वातंत्र्य चौक याठिकाणीही विद्युत रोषणाईतुन राष्ट्रभक्तीचा जागर केला आहे. महापुरूषांच्या पुतळ्यांवर रोषणाई : शहरातील १९ सार्वजनिक स्थळी असलेल्या राष्ट्रीय महापुरूषांच्या पुतळ्यांवर रोषणाई केली आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महाराणा प्रताप पुतळा, महात्मा गांधी पुतळा, पंडीत जवाहरलाल नेहरू पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लाल बहादूर शास्त्री पुतळा, नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळा, स्वातंत्र्यविर वि. दा. सावरकर पुतळा, शाहिर अण्णाभाऊ साठे पुतळा, सानेगुरूजी पुतळा, स्व. जेठमल स्वारस्वत स्तंभ, महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, संत गाडगे बाबा पुतळा, धनाजी नाना पुतळा, महर्षी वाल्मीक पुतळा, कवयित्री बहिणाबाई पुतळा, संत जगनाडे महाराज पुतळा, नवल स्वामी महाराज पुतळा या पुतळ्यांवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्युत रोषणाई केली आहे.
स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याला जैन उद्योग समूहाकडून सन्मान
जळगाव : ‘आपल्या मातृभूमिला गुलामगिरीतुन मुक्त करण्यासाठी संपूर्ण भारत पेटून उठला होता. प्रत्येकाच्या मनात भारतीय हीच भावना जागृत होऊन स्वातंत्र्याचा संग्राम घडला.’ या स्वातंत्र्य संग्रामात....
कविवर्य ना.धों. महानोर यांना आचार्य अत्रे मानचिन्ह पुरस्कार
जळगाव : संयुक्त महाराष्ट्राचे झुंजार सेनापती, साहित्य सम्राट, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या १२४ व्या जयंतीदिनी (१३ ऑगस्ट) आचार्य अत्रे मानचिन्हाचा पुरस्कार यावर्षी प्रख्यात कवी....
गांधी रिसर्च फाऊंडेशन, मराठी प्रतिष्ठानच्या वतीने निमखेडी शिवारात वृक्षारोपण
जळगाव : निमखेडी शिवारातील राधिका पॉइंटजवळील खुल्या भूखंडामध्ये स्थानिक रहिवाशांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला. गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठानतर्फे जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. च्या सहकार्यातून....
छप्पर फाटले पत्र्याचे, बिबट्या पडला घरात—- कुटूंब सदस्य खिडकी तोडून पळाले दारात!
नाशिक : मांजरीचा पाठलाग करतांना पत्र्याचे छत असलेल्या घरावर झेप घेणा-या बिबट्याच्या वजनाने छप्पर फुटून तो घरात कोसळला. बुधवारच्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील....
जैन उद्योग समूहातर्फे होणार 8000 राष्ट्रध्वजाचे वितरण
जळगाव : स्वातंत्र्य लढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सांगता दि.15 ऑगस्ट 2022 रोजी होत आहे. देशासाठी बलिदान करणाऱ्या देशभक्तांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण अंत:करणात कायम जागते राहावे आणि आपला....
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे ‘भारत से जुडे रहो’ संवादात्मक कार्यक्रम
जळगाव – भारतात प्रतिभावान युवकांची संख्या सर्वात जास्त आहे. हिच प्रतिभा भारताला सामर्थ्यशाली बनवू शकते फक्त तरूणांच्या अवलोकन, विश्लेषण आणि परिश्रमातून नवसंकल्पनेला चालना देणाची गरज....
शिवाजी नगर पुलाचे उद्घाटन जनता करणार – आ. भोळे
जळगाव : सतत मुदतवाढ मिळत गेल्याने जळगावच्या शिवाजी नगर पुलाचे काम साडेतीन वर्ष रखडले. आता या पुलाचे काम पुर्णत्वास आले आहे. ठेकेदारास विविध कारणामुळे सतत....














