शिवाजी नगर पुलाचे उद्घाटन जनता करणार – आ. भोळे

जळगाव : सतत मुदतवाढ मिळत गेल्याने जळगावच्या शिवाजी नगर पुलाचे काम साडेतीन वर्ष रखडले. आता या पुलाचे काम पुर्णत्वास आले आहे. ठेकेदारास विविध कारणामुळे सतत मुदतवाढ मिळत गेल्याने हा पुल वादात सापडून चर्चेत आला. अठरा महिने निर्माण कालावधी ठेकेदारास दिला असतांना तब्बल तिन ते साडेतीन वर्षाचा कालावधी या पुलाच्या निर्मीतीला लागला. या पुलाचे उद्घाटन जनतेने करावे असा एक मतप्रवाह या निमित्ताने निर्माण झाला आहे.

सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्यासह काही नागरिकांनी या पुलाच्या रस्त्यावर लावलेले बॅरिकेट्स हटवून हा पुल जनतेसाठी आहे त्या अवस्थेत खुला केला होता. या पुलावर डांबरीकरणाचे काही दिवसांचे काम बाकी असतांना देखील संतप्त जनतेने हा पुल स्वत:च सुरु केला होता. मात्र जनप्रक्षोभ लक्षात घेता अपुर्ण काम पोलिस बंदोबस्तात पुर्ण केले जात आहे.

या पुलावरील डांबरीकरणाचे काम जवळपास पुर्ण झाले आहे. या पुलाच्या निर्मितीसाठी सतत पाठपुरावा करण्यास कुणी लोकप्रतिनिधी आला नसल्याची ओरड होत आहे. त्यामुळे या पुलाचे उद्घाटन केवळ सामान्य नागरिकाने करावे यासाठी सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी आ. सुरेश भोळे यांच्याशी फोनवर संपर्क साधला. पुलाचे उद्घाटन जनता करणार असल्याचे आ. भोळे यांनी गुप्ता यांना म्हटले आहे. या पुलाचे काम सुरु असतांना आ. सुरेश भोळे यांनी या पुलावरुन आपले चारचाकी वाहन नेले होते. पुलाचे काम सुरु असतांना वाहनची रपेट मारुन आ. भोळे यांनी एकप्रकारे या पुलाचे उद्घाटनच केले असे म्हटले जात आहे. त्यानंतर गुप्ता यांच्यासह नागरिकांनी बॅरिकेट्स हटवून तो पुल जनतेसाठी खुला करुन दिला होता. त्यानंतर तो पुन्हा बंद करुन काम सुरु करण्यात आले. अशा प्रकारे वारंवार वादात सापडलेल्या या पुलाचे उद्घाटन जनतेने करावे असे म्हटले जात आहे. या पुलाच्या उद्घाटनाची आवश्यकताच नसून तो केवळ सुरु करुन द्यावा असे देखील काही संतप्त नागरिक बोलत आहेत. या पुलाच्या उद्घाटनाचे श्रेय कुणी लोकप्रतिनिधीने घेवू नये असे म्हटले जात आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here