कैद्यांना जामीनावर सोडा – सर्वोच्च न्यायालय

सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : तुरुंगात कोरोना विषाणूचा संसर्ग बळावण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे कैद्यांना तुरुंगातून सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्व राज्यांतील उच्च स्तरीय समितीने मागील वर्षी जारी केलेल्या निर्देशानुसार कैद्यांना तुरुंगातून सोडण्याचा निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. मागील वर्षी न्यायालयाने सर्व कैद्यांना जामीनावर सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार अनेक कैदी सोडण्यात आले होते. सोडण्यात आलेले कैदी पुन्हा तुरुंगात आले आहेत.
तुरुंगात क्षमतेपेक्षा जादा कैदी असल्यामुळे कैद्यांसोबत कर्मचारी देखील संक्रमीत होत आहेत. याबाबतची दखल मुख्य न्यायधीश एन.व्ही. रमन यांनी घेतली असून त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

कैद्यांना सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या संकेतस्थळावर अपलोड केले आहेत. विविध राज्यात स्थापन करण्यात आलेल्या उच्च स्तरीय समित्यांनी मागील वर्षी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ज्या कैद्यांना मागील वर्षी सोडले होते त्यांना पुन्हा नव्याने सोडावे. तसेच जे कैदी मागील वर्षी पॅरोलवर गेले होते त्यांना परत 90 दिवसांसाठी सोडावे. याशिवाय अतिशय महत्वाच्या प्रकरणातच आरोपींना अटक केली जावी असे न्यायालयाने म्हटले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here