स.पो.नि. शेलार यांच्या आईचा खूनी अटकेत

काल्पनिक छायाचित्र

पुणे : स.पो.नि. विठ्ठल अरुण शेलार यांची आई शहाबाई अरुण शेलार यांचा खून करणा-या आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. घरात चोरी करण्यासाठी आलेला आरोपी बघून जोरात ओरडल्यामुळे आपण पकडले जाऊ या भितीपोटी डोक्यात रॉड मारल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे अटकेतील आरोपीने कबुल केले आहे.

अफसर अस्लम अली (19) रामनगर मुळ रा. जोनपुर उत्तर प्रदेश असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तो आपल्या मुळ गावी उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या बेतात असतांना त्याला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे शाखा युनीट तिनच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. पोलिस हवालदार राजेंद्र मारणे यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांच्या पथकातील कर्मचा-यांनी संगमवाडीतील परिसरातील ट्रॅव्हल्स पार्कींगजवळून त्याला पळून जाण्याच्या बेतात असतांना ताब्यात घेत अटक करण्यात आली.

या कारवाईत पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, सहायक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, राजेंद्र मारणे, संतोष क्षीरसागर, एकनाथ कंधारे, महेश निंबाळकर, हनुमंत गायकवाड, रामदास गोणते, दीपक क्षीरसागर, विल्सन डिसोझा, सुजीत पवार, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे, गणेश पाटोळे, ऋषीकेश कोळप, अतुल मेंगे, मॅगी जाधव आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here