सचिन वाझे पोलिस दलातून बाहेर

मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरणासह मनसुख हिरेन मृत्युप्रकरण स.पो.नि. सचिन वाझे यांच्या चांगलेच अंगाशी आले आहे. महत्प्रयासाने पोलिस दलात पुनरागमन केल्यानंतर सचिन वाझे यांना पुन्हा पोलिस दलातून बाहेर जाण्याची वेळ आली आहे. त्यांना सेवेतून बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना बडतर्फ करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडून देण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेच्या तरतुद 311(2)(ब) नुसार आज याप्रकरणी आदेश काढण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी विशेष शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील कोल्हे यांनी महाराष्ट्र एटीएस व एनआयएला एक पत्र दिले होते. त्यात सचिन वाझे यांच्या प्रकरणातील काही कागदपत्रांची मागणी केली होती. यामधे त्यांच्या विरुद्ध असलेल्या प्रथम खबरी अहवालाचा समावेश होता. सदर कागदपत्रे सोमवारी विशेष शाखेला मिळाले. विशेष शाखेचे अधिकारी आपला अहवाल तयार करुन राज्य सरकारला सोपवतील आणि सचिन वाझे यांच्यावर भा. दं. वि. 1949 च्या कलम 311 नुसार कारवाईसाठी परवानगी मागतील असे म्हटले जात होते. मात्र आता सचिन वाझे यांना पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here