हल्ल्यानंतर देखील पुणे पोलिसांनी घेतले संशयित महिलेस ताब्यात

काल्पनिक छायाचित्र

पुणे : पुण्याच्या बुधवार पेठेत सहायक फौजदाराच्या हत्येप्रकरणी संशयीत महिलेस ताब्यात घेण्याकामी उत्तर प्रदेशात गेलेल्या पोलिस पथकावर गाजीयाबाद थाना नंदग्राम क्षेत्र येथे आज हल्ला झाला. स्थानिक पोलिसांसह पथकातील काही कर्मचारी कमी अधिक प्रमाणात जखमी झाले असले तरी देखील संशयीत महिलेला ताब्यात घेण्यात तपास पथकाला यश आले आहे. या हल्ल्याप्रकरणी गाझियाबाद पोलिसांनी सहा संशयीतांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध रितसर गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या आठवड्यात पुण्यातील तडीपार गुंड प्रविण महाजन याने सहायक फौजदार समीर सय्यद यांना चाकूने गळयावर वार करत जिवे ठार केले होते. या प्रकरणी प्रविण महाजन सोबत असलेल्या व सध्या फरार महिलेला ताब्यात घेण्याकामी पुणे पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशात गेले होते. सदर संशयीत महिला गाझीयाबाद येथे पळून गेली असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानुसार पुणे पोलिसांचे पथक गाझियाबाद येथे गेले होते. त्या महिलेला ताब्यात घेत पुणे पोलिसांचे पथक उद्या पुणे येथे दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here